Badlapur case : बदलापूर प्रकरण; उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील नियुक्त करण्यास काँग्रेसचा विरोध !

Badlapur case : बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान, बदलापूर प्रकरणाचा खटला चालविण्यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र, काँग्रेसने निकम यांच्या नियुक्तीवरच हरकत घेतली आहे.

Badlapur case : Badlapur case; Congress opposes appointment of Ujjwal Nikam as public prosecutor!

ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी नुकतीच लोकसभेची निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढवली. विशेष म्हणजे निकम ज्या पक्षाचे नेते आहेत, त्याच पक्षाशी संबंधित शाळेत हा प्रकार घडला आहे. त्यामुळे उद्या हे प्रकरण दाबले गेले तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. बुधवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर जोरदार आक्षेप घेतला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या या महाराष्ट्रात पीडित कुटुंबांना १२ तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले गेले. पीडित मुलीची गरोदर आई बाकड्यावर झोपली होती. हे पाहून राज्यकर्ते म्हणून तुम्हाला वाज वाटत नाही का? घटनेचा निषेध करून कारवाई करण्याऐवजी तुम्ही विरोधकांवर त्याचे खापर फोडता, असाही घणाघात श्री.वडेट्टीवार यांनी केला आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

बदलापूरच्या आंदोलनात विरोधकांचा कुठे हात होता, हे सरकारने दाखवून द्यावे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी राजीनामा दिला पाहिजे. सदर घटना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात झाल्यामुळे त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. राज्यात पोलिसांचा धाक राहिलेला नाही. कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे. या प्रकरणात कुणी दबाव आणला त्याची सखोल चौकशी करा, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button