जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान

Ashok Jain : जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांना स्व. दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार गोव्याचे माजी मुख्यमंत्री व भारत सरकारचे माजी कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, गुळाची भेली, मानपत्र आणि रूपये 51 हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.

उंडाळ येथील स्व. दादा उंडाळकर यांच्या 50 व्या सुवर्ण महोत्सवी स्मृती दिनानिमित्त आयोजित 41 व्या स्वातंत्र्य संग्राम व माजी सैनिक अधिवेशनात सदरचा पुरस्कार अशोक जैन यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख विश्वस्त उदयसिंह उंडाळकर, ट्रस्टचे विश्वस्त विजयसिंह पाटील, आमदार महेश शिंदे, प्रा. गणपतराव कणसे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक उदयसिंह पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ‘प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा सुयोग्य वापर कसा करायचा ते सांगून त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल भवरलाल जैन यांनी ठिंबक सिंचनाद्वारे क्रांती करून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केले. त्यांनी कायम शेतकरी हाच केंद्रबिंदू मानला आणि त्यासाठीच आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या शेती आणि शेतकरी यांच्याविषयीच्या अतूलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने पद्मश्री देऊन गौरव केला. त्यांच्यानंतर अशोक जैन हा वारसा पुढे नेत आहेत आणि लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडावा यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांच्या या कार्यासाठी नक्कीच पद्मविभूषण देऊन गौरव व्हायला व्हवा अशी भावना रमाकांत खलप यांनी व्यक्त केली.’

पुरस्कार स्विकारल्यानंतर अशोक जैन म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक ज्यांना आदरपूर्वक ‘स्वातंत्र्यवीर’ संबोधले जाते त्या आदरणीय दादासाहेब उंडाळकर यांना विनम्र अभिवादन करतो. ‘जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले.’ राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या कृतीशील देशभक्तीचा खोलवर प्रभाव स्वातंत्र्य सैनिकांच्या मनावर ठसला होता. शब्दांना आचरणाची भरभक्कम जोड असल्यावरच माणसे नतमस्तक होतात. गांधीजी म्हणायचे, ‘अहिंसा ही मानवाला मिळालेली सर्वात मोठी शक्ती आहे. ही माणसाने तयार केलेल्या अत्यंत शक्तिशाली शास्त्रापेक्षाही अधिक शक्तिशाली आहे.’ गांधीजींचा मार्ग अनुसरून हजारो, लाखो देशभक्तांनी स्वातंत्र्य युद्धात स्वतःला झोकून दिलं. त्यात दादासाहेब उंडाळकर हेसुद्धा अग्रभागी होते. आपल्या देशातील काही परिवार असे आहेत ज्यांची सुवर्ण अक्षरांनी नोंद घेतली पाहिजे, त्यात उंडाळकर परिवार आहे हे अभिमानाने सांगावेसे वाटते. वडिलांनी अंगीकारलेलं व्रत सुपुत्रानेही जाणीवपूर्वक स्वीकारणं ही किती महत्त्वाची बाब आहे.

जैन इरिगेशनने दिली 5 लाख रूपये रक्कम
स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर सामाजिक पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ, गुळाची भेली, मानपत्र आणि रूपये 51 हजार रोख असे स्वरूप आहे. या पुरस्काराची रक्कम न स्विकारता अशोक जैन यांनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या वतीने रूपये 5 लाख जाहीर करून एकत्रित रुपये 5 लाख 51 हजार स्वातंत्र सैनिकांच्या विविध उपक्रमांसाठी उपयोग करण्याची विनंती केली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button