अशोकभाऊ जैन यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जाहीर

Ashok Jain : सातारा जिल्ह्यातील उंडाळे (ता. कराड) येथे स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर यांच्या 50 व्या स्मृतीदिनानिमित्त 41 वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन रविवारी (ता. 18) करण्यात आले आहे. त्यात यंदाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन वितरीत केला जाणार आहे.

यांना माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते अशोकभाऊ जैन यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. सन 1992 पासून सुरू झालेला हा पुरस्कार यापुर्वी स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ, सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, कृषितज्ज्ञ जयंत पाटील, पत्रकार पी. साईनाथ, डॉ. प्रकाश आमटे, नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने, पद्मश्री डॉ. गणेश देवी, नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपूरे यांच्यासह इतर मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे. तो मान यंदा जळगावच्या अशोकभाऊ जैन यांना मिळाला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button