Jalgaon gramin : गुलाबराव देवकरांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर होताच विरोधकांचे चेहरे पडले…!
Jalgaon gramin : निष्ठावानांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून माजी मंत्री गुलाबराव देवकरांना यंदा उमेदवारी मिळणार नाही, अशी अफवा विरोधकांकडून अलिकडे पसरविण्यात आली होती. तसेच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला शिवसेना ठाकरे गट जळगाव ग्रामीण मतदारसंघावर दावा करणार असल्याची देखील चर्चा विरोधकांनी घडवून आणली होती. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्या यादीत गुलाबराव देवकरांचे नाव जळगाव ग्रामीणसाठी समाविष्ठ करून विरोधकांना मोठी चपराक दिली आहे. त्यामुळे संबंधित सर्व विरोधकांचे चेहरे आता पाहण्यासारखे झाले आहेत.
Jalgaon gramin : As soon as Gulabrao Deokar’s candidature of NCP was announced, the opposition’s faces fell
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव देवकरांना राष्ट्रवादीची उमेदवारीच मिळू नये, यासाठी विरोधक बऱ्याच दिवसांपासून देव पाण्यात ठेवून बसलेल होते. मात्र, माजी मंत्री श्री.देवकर हे कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता जळगाव ग्रामीणमधील एकेक गाव पिंजून काढत होते. अपेक्षेनुसार त्यांना पहिल्या फळीतील मातब्बर उमेदवारांच्या यादीत स्थान देऊन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचा सन्मान कायम राखला आहे. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील उत्साह त्यामुळे आणखी द्विगुणीत झाला आहे. तर विरोधकांना मोठा हादरा बसल्याचे बोलले जात आहे.
विधानसभेचा जळगाव ग्रामीण मतदारसंघ गेल्या दोन पंचवार्षिकपासून शिवसेनेच्या ताब्यात असला तरी त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव थोडाही कमी झालेला नाही. पक्षात उभी फूट पडल्यानंतरही निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या विचारांशी जुळलेली नाळ तुटू दिलेली नाही. याचाच मोठा धसका घेतलेल्या शिवसेना शिंदे गटाने विधानसभेच्या आगामी निवडणुकीचे वेध लागताच राष्ट्रवादीच्या काही लोकांना फोडण्यासाठी अलिकडे हालचाली गतीमान केल्या होत्या. मात्र, मोठी उठाठेव करूनही राष्ट्रवादीचे निष्ठांवत कार्यकर्ते जाळ्यात अडकत नसल्याने त्यांच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरले होते.