जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दादर ज्वारीला मिळाला ‘इतका’ भाव…!
APMC Jalgaon : जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून रब्बी हंगामातील दादर ज्वारीची आवक वाढली आहे. सोमवारी (ता.18) देखील बाजार समितीत दादर ज्वारीची सुमारे 520 क्विंटल आवक होऊन किमान 2600, कमाल 3165 आणि सरासरी 2900 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, सोमवारी (ता.18) जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बोल्ड हरभऱ्याची 18 क्विंटल आवक होऊन त्यास सरासरी 9975 क्विंटल भाव मिळाला. याशिवाय चाफा हरभऱ्याची 63 क्विंटल आवक झाली, त्यास 5330 ते 5600 आणि सरासरी 5400 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. काबुली हरभऱ्याची 14 क्विंटल आवक होऊन 6250 ते 7325 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. लाल हरभऱ्याची 07 क्विंटल आवक होऊन सरासरी 8150 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सोयाबीनची 70 क्विंटल आवक झाली, त्यास 4200 ते 4250 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. 147 गव्हाची 15 क्विंटल आवक झाली, त्यास सरासरी 2815 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला.