जळगावच्या अनुभूती स्कूलमध्ये तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प सादरीकरण

Anubhuti School : जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकूण 37 प्रकल्प साकारले आहेत. समाज हितासाठी उपयुक्त असलेल्या संकल्पनांवर आधारीत प्रकल्पांवर विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेतून काम केले. त्यात विज्ञान, तंत्रज्ञान, आर्टिफिशीयल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, केमिस्ट्री, बायोलॉजी, भौतिकशास्त्र, अवकाश तंत्रज्ञान, रोबोटिक्स, थ्री डी प्रिंटींगसह अन्य विषयांचा समावेश आहे.

अनुभूती निवासी स्कूलमधील असेंम्बली हॉलमध्ये सर्व प्रकल्प ठेवण्यात आले आहे. त्यांचे उद्घाटन बुधवारी (ता. 28) जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबासिस दास, अभंग जैन उपस्थित होते. दोन दिवसीय प्रोजेक्ट सादरीकरणात इतर शाळांसाठी ‘सायन्स क्विझ’ देखील आयोजित केली आहे. अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘अनुभूती इनोव्हेशन’ सेंटर असून रोबोटिक लॅबसह आर्टिफियल तंत्रज्ञानासहन विद्यार्थांमध्ये संशोधात्मक वृत्तीला चालना मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वर्षभर विद्यार्थी चांद्रयान-3, भूमिती व गणितीय प्रोजेक्ट, मायक्रोबॉयॉलाजी, मेडिकल टेक्नोलॉजी, इलेक्ट्रोमॅग्रेटीक लिफ्टचे उपकरणांसह विज्ञानावर आधारित विविध मॉडेल, प्रोजेक्ट शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली साकारतात. यावर्षी 37 निरनिराळ्या प्रकारचे विज्ञान प्रोजेक्ट साकारलेले आहेत. विशेष उल्लेखनीय असे की ड्रोन टेक्नॉलॉजी, बायोफर्टिलायझर, बेसिक रोबोटिक्स, सोलर ट्रॅकिंग सिस्टीम्स, अंतराळ विज्ञान यांचा समावेश होता. यासोबतच पर्यावरण, माहिती तंत्रज्ञान, गणित, इंजिनेअरिंग, कॉम्प्युटर, रोबोटिक्स तंत्रज्ञानावर आधारित हे प्रोजेक्ट आहेत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button