Amol Kolhe : ’50 खोके, एकदम ओके आणि वाघांचे झाले बोके’….जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ आमदारांवर खासदार डॉ.अमोल कोल्हेंचा निशाणा !
Amol Kolhe : “50 खोके, एकदम ओके आणि वाघांचे झाले बोके” म्हणत खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी जळगाव जिल्ह्यातील त्या आमदारांवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेचे पाच आमदार आणि राष्ट्रवादीचे एक आमदार यांनी गद्दारी करून मंत्री पदाच्या खुर्चीसाठी जनतेच्या विश्वासाला तडा दिला. जळगाव जिल्ह्यातील सहा आमदारांनी जनतेशी गद्दारी केली असून याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल, असेही डॉ.कोल्हे म्हणाले.
Amol Kolhe: ’50 boxes, totally OK and tigers have become boke’….MP Amol Kolhe targets ‘those’ MLAs in Jalgaon district!
चोपडा शहरात शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने रविवारी आयोजित जाहीर सभेत खासदार डॉ.अमोल कोल्हे बोलत होते. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, ज्येष्ठ नेते अरूण गुजराथी, राष्ट्रवादीचे निरीक्षक भास्करराव काळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी आमदार जगदीश वळवी, ललीत बागूल, डॉ.चंद्रकांत बारेला आदी उपस्थित होते. दरम्यान, डॉ. कोल्हे यांच्यााााााााा टीकेचा रोख विशेषत: जळगावमधील शरद पवारांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या एका आमदाराकडे होता, ज्यांनी मंत्री पदासाठी नंतर आपली भूमिका बदलली. जळगावच्या राजकीय वर्तुळात खासदार कोल्हेंच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. राजकीय वातावरण तापल्यानंतर आता या आमदारांची पुढील काय प्रतिक्रिया असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका करत, उद्योगधंदे गुजरातला पळवले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. “स्वतःला महाशक्ती म्हणवणाऱ्यांच्या डोळ्यादेखत महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात आहेत आणि युवकांचा रोजगार हिरावला जात आहे,” असे डॉ.कोल्हे म्हणाले. त्यांनी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर “गुजराती बॉसच्या ताटाखालचे मांजर” असल्याचा आरोप करत, या नेत्यांना याचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले.
“या गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे,” असे आवाहन करत डॉ.कोल्हे यांनी उपस्थितांना एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले. शिवाय, भाजपच्या राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर सत्ताधाऱ्यांनी मौन पाळल्याबद्दलही त्यांनी सवाल केला. “छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सांगणाऱ्या महाराष्ट्रात जर दोन चिमुकलींवर अत्याचार होत असतील, तर यावर हे गप्प का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “बहीण जर लाडकी असेल, तर तिच्या सुरक्षिततेची हमी सुद्धा दिली पाहिजे,” असे म्हणत डॉ.कोल्हे यांनी सध्याच्या सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी प्रशासनातील ढिलाई आणि अधिकाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा वचक नसल्याचीही टीका केली.