शरद पवारांचे खंदे समर्थक खासदार अमोल कोल्हे यांनी घेतला ‘हा’ धक्कादायक निर्णय !

जळगाव टुडे । शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शरद पवारांचे खंदे समर्थक खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मोठा धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यांच्या त्या निर्णयामुळे सर्वत्र खळबळ देखील उडाली आहे. राजकारण हा पार्टटाईम व्यवसाय नसून, फुलटाईम सेवा करण्याचे क्षेत्र असल्याने आपण सदरचा निर्णय घेतल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे. त्यांच्या त्या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

”मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे असतील तर मला पूर्णवेळ काम करावे लागणार आहे. अभिनय क्षेत्राला ब्रेक जरी घेतला तरी आत्ता शिरुर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवणे यालाच माझे प्राधान्य आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रासाठी ब्रेक घ्यावा लागला तरी माझी काहीच हरकत राहणार नाही,” असे बोलून खासदार अमोल कोल्हे यांनी अभिनय क्षेत्रातून पाच वर्षांच्या कालावधीसाठी ब्रेक घेणार असल्याचे जाहीर केले आहे. “माझ्या या निर्णयामुळे चाहत्यांची निराशा होऊ शकते. मात्र शिरूरमधील जनतेने माझ्यावर विश्वास दाखवायचे ठरवले आहे. मालिका विश्वात काम करत असताना पूर्ण वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे पुढील पाच वर्षांसाठी मी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे,” असे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिरूरमध्ये पुन्हा कोल्हे विरोधात आढळराव अशी थेट लढत यंदाही होत आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button