Ajit Pawar Ncp : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेवर जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचे सावट…!

Ajit Pawar Ncp : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने संपूर्ण महाराष्ट्रभर जनसन्मान यात्रा काढली असून, ती आज सोमवारी जळगाव जिल्ह्यात दाखल होत आहे. त्यानिमित्त अमळनेर येथे पक्षातर्फे युवा संवाद व शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. दरम्यान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून गेल्याच आठवड्यात पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत, ज्याचे सावट अजित पवारांच्या यात्रेवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Ajit Pawar Ncp : The displeasure of office bearers in Jalgaon district over Ajit Pawar’s Ncp Jansanman Yatra…!

लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने जेमतेम चार ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. प्रत्यक्षात तीन जागांवर त्यांना सपाटून मार खावा लागला. खुद्द बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या सुप्रियाताईंकडून पराभूत झाल्या. काका शरद पवारांशी केलेले बंड अजित पवारांना लोकसभेच्या निवडणुकीत चांगलेच महागात पडले. त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी अजित पवारांनी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालण्यासाठी जनसन्मान यात्रा काढली आहे. त्याच निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात आज सोमवारी युवा संवाद आणि शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

मंत्र्यांसह जिल्ह्याध्यक्षांवर पदाधिकाऱ्यांनी ठेवलाय निष्क्रियतेचा ठपका

विधानसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली असताना, जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीने आपली वज्रमूठ तयार करून महायुतीचा जोरदार सामना करण्याची जय्यत तयारी केलेली आहे. दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार गट मात्र अंतर्गत कलहामुळे पूर्णतः खिळखिळा झाल्याचे बोलले जात आहे. वैयक्तिक मंत्री अनिल पाटील तसेच पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवून काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गेल्याच आठवड्यात आपल्या पदांचे सामुहिक राजीनामे सुद्धा दिले. ज्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, जिल्हा सरचिटणीस निंबाजीराव पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष शामकांत पाटील आदींचा समावेश होता. भाजपासोबत सत्तेवर असुनही राष्ट्रवादीकडून कोणतीच लोकहिताची कामे होत नाही तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांची कोणत्याही समितीवर नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे विनाकारण पदावर राहणे आम्हाला योग्य वाटत नाही, अशी बरीच कारणे राजीनामे देणाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी पुढे केली आहेत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button