Ajit Pawar : शेतकऱ्यांना बिलाची चिंता नाही; शेतीसाठी वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध होणार

Ajit Pawar : राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका करताना लाडक्या भावांसाठी काहीच योजना नसल्याचा आरोप केला होता. मात्र, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठी योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणारी वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे वीज बिलाची चिंता संपणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar : Farmers don’t worry about electricity bills; Electricity required for agriculture will be available through solar energy

सौर ऊर्जेच्या माध्यमातून एकही पैसा न भरता सौर पंपाचा वापर करून आता शेतीला पाणी देणे शक्य होणार आहे, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे, ज्याची सुरुवात आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून करण्यात आली. या यात्रेदरम्यान अजित पवार यांनी आपल्या भाषणातून जनतेला मार्गदर्शन केले आणि लाडक्या बहिणींसह लाडक्या भावांनाही साद घातली.

आपल्या भाषणात अजित पवार यांनी सांगितले की, “मी दहा वर्ष राज्याचा अर्थमंत्री राहिलो आहे. मी दहा अर्थसंकल्प मांडले आहेत. त्यामुळे कुठे बचत करून योजनांना पैसा देता येतो, हे मला चांगलं माहिती आहे.” त्यांनी हे देखील ठामपणे सांगितले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही पुढील पाच वर्षे सातत्याने सुरू राहील. अजित पवार यांनी आपल्या अनुभवाचा दाखला देत सांगितले की, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या वित्तीय नियोजनात ते निपुण आहेत. त्यांनी ही खात्री दिली की महिलांसाठी सुरू केलेली योजना दीर्घकाळ टिकवण्याच्या दृष्टीने सर्व आवश्यक आर्थिक व्यवस्था करण्यात येणार आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button