अजितदादा पवार लवकरच आपल्या मिशा काढणार ?

Jalgaon Today : राजकारणात कधी काय होईल आणि कोण काय बोलून जाईल, याचा अजिबात नेम नसतो. आता हेच पाहा ना, अजितदादा पवार राजकारणासाठी चक्क मिशा काढणार आहेत म्हणे. अजितदादा तसे शब्दाचे पक्के तर आहेतच. त्यांच्या मिशा काढण्याला कारणही तसेच गंभीर आहे आणि त्यांनी त्यासाठी 4 जून नंतरचा मुहुर्त काढला आहे. दादा खरोखर मिशा काढतात किंवा नाही, त्याकडे आता बारामतीसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Ajit Pawar)

बारामती लोकसभा मतदारसंघात अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांची बहिण सुप्रिया सुळे यांच्यात दुरंगी लढत रंगली आहे. निव्वळ राजकारणामुळे कधीकाळी एकसंध असलेल्या पवार कुटुंबात मोठे वितुष्ट निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, पवार कुटुंबातच आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले असून महिला वर्गही त्याबाबतीत मागे राहिलेला नाही. तशात अजितदादांनी शनिवारी बारामती झालेल्या प्रचार सभेत मोठं विधान करून चांगलीच खळबळ उडवून दिली.

अजितदादांच्या म्हणण्यांनुसार सध्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रचारात दिसत असलेला पवार कुटुंबातील एकही जण 04 जूननंतर दिसणार नाही. जर एकजण पण दिसला तर मी माझ्या मिशा काढून टाकेन, अशी भीष्म प्रतिज्ञा सुद्धा त्यांनी केली आहे. त्यांच्या त्या विधानानंतर अनेकजण अवाक झालेले असले तरी त्यांचेच भाऊ श्रीनिवास पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “अजित दादा शब्दाचे पक्के असतील तर त्यांनी फक्त जे म्हटलंय ते लक्षात ठेवावे. त्यांनी जर सर्व पवारांबाबत असे काही वक्तव्य केले असेल तर त्यांनी 4 जूनपूर्वीच मिशा काढायला हव्यात, असेही श्रीनिवास पवार म्हटले आहेत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button