Agriculture News : जळगावच्या शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या; अन्यथा तुम्हाला पीक नुकसान भरपाई मिळणार नाही…!

Agriculture News : जळगाव जिल्ह्यातील सुमारे १२ हजार ५०८ शेतकऱ्यांनी ई-केवायसीचे प्रमाणिकरण अजुनही केलेले नाही. त्यामुळे शासनस्तरावरुन पीक नुकसानीचे अनुदान मंजूर झालेले असूनही ते लाभार्थी शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यासाठी गावस्तरावरील तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्यामार्फत ई-केवायसी तातडीने करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Agriculture News : Farmers of Jalgaon pay attention here; Otherwise you will not get crop compensation…!

जळगाव जिल्ह्यातील सन २०२२ पासून शेतीपिकाच्या नुकसानीचे अनुदान वितरित करण्यासाठी वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार २ लाख १३ हजार ४१६ शेतकऱ्यांना शासनस्तरावरुन डीबीटी प्रणालीद्वारे जवळपास २४४ कोटी अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. मात्र जिल्ह्यातील १२ हजार ५०८ शेतकऱ्यांनी ई-केवायसीचे प्रमाणिकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरुन अनुदान मंजूर झालेले असूनही सदर अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यासाठी गावस्तरावरील तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांचेमार्फत ई-केवायसी करण्यासाठी यापूर्वी प्रयत्न करण्यात आले आहे. तरी देखील अद्यापही काही शेतकरी ई-केवायसी न केल्यामुळे अनुदानापासून वंचीत आहेत.

विशेषत: माहे जानेवारी २०२४ ते माहे मे २०१४ या कालावधीत जिल्ह्यातील भडगाव, मुक्ताईनगर, पारोळा ,अमळनेर व जामनेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकाच्या नुकसानीपोटी ५ हजार ८५४ शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरून अनुदान मंजूर झालेले असूनही ते त्यांच्या खात्यावर जमा करता आलेले नाही. तरी संबंधित शेतकऱ्यांनी सीएससी केंद्र व महा ई-सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी करावे. आपल्या शेतातील पिकांच्या नुकसानीचे अनुदान त्वरीत प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन सर्व संबंधित शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी,जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button