यवतमाळच्या आदिवासी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्याचे वाटप !
जळगाव टुडे । ‘अखिल भारतीय कापूस एफपीओ असोसिएशन’ तसेच ‘कॉटन गुरू महाफ्पो फेडरेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च’ (नागपूर) यांच्या सहकार्याने यवतमाळ जिल्ह्यातील १०० आदिवासी कापूस शेतकऱ्यांना अत्यावश्यक शेती उपयोगी साहित्याचे वितरण नुकतेच करण्यात आले. त्याबद्दल संबंधित सर्व आदिवासी पट्ट्यातील शेतकऱ्यांनी समाधान देखील व्यक्त केले. ( Agriculture News )
Agriculture News
आदिवासी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राबविण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमातंर्गत ‘अखिल भारतीय कापूस एफपीओ असोसिएशन’, ‘कॉटन गुरू महाफ्पो फेडरेशन’ आणि ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च’ ( CICR ) नागपूरच्या सहकार्याने कुंभारी (ता.घाटंजी) येथील १०० आदिवासी कापूस शेतकऱ्यांना अत्यावश्यक कृषी साहित्य वितरित करण्यात आले. ज्याचा मुख्य उद्देश आदिवासी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कृषी उत्पादनक्षमता आणि उपजीविका वाढविणे हा होता.
Agriculture News
आदिवासी शेतकऱ्यांना वितरित केलेल्या वस्तूंमध्ये ताडपत्री, टॉर्चेस आणि उपयुक्त एनपीके फॉर्म्युलेशन्सचा समावेश होता, ज्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीच्या कामात आणि एकूण पीक व्यवस्थापनात मोठा फरक पडण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. “आम्ही अखिल भारतीय कापूस एफपीओ असोसिएशन, कॉटन गुरू महाफ्पो फेडरेशन आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च यांचे आभार मानतो. कारण शेती उपयोगी साहित्य आमच्या दैनंदिन शेतीच्या कामात खूपच उपयुक्त ठरणार आहेत,” अशी भावना दहेगावचे तरुण शेतकरी ऋषिकेश मेश्राम यांनी व्यक्त केली.
Agriculture News
दरम्यान, “शेतकऱ्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आम्ही आनंदित आहोत. आज वितरित केलेल्या शेती उपयोगी साहित्यामुळे त्यांचे काम अधिक कार्यक्षम आणि उत्पादक होईल,” असे कॉटन गुरू महाफ्पो फेडरेशनचे पदाधिकारी म्हणाले. आगामी काळात अखिल भारतीय कापूस एफपीओ असोसिएशन आणि कॉटन गुरू महाफ्पो फेडरेशनच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात फेरोमोन ट्रॅप्स आणि पूरक खतांसारख्या उपयुक्त उत्पादनांचे आणखी वितरण करण्याची योजना आखण्यात आली आहे. शाश्वत कृषी विकास आणि आदिवासी शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे आहे, हा त्यामागचा मुख्य उद्देश असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
Agriculture News
अखिल भारतीय कापूस एफपीओ असोसिएशन २०० हून अधिक शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) आणि १००,००० हून अधिक शेतकऱ्यांशी जुळलेली आहे. तर कॉटन गुरू महाफ्पो फेडरेशन हे ८१ शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) आणि ४५,००० हून अधिक शेतकऱ्यांशी जुळलेले आहे. याशिवाय नागपूरची सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च ही संस्था भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) अंतर्गत एक प्रमुख संशोधन संस्था आहे. CICR कापूस संशोधनाला पुढे नेण्यास आणि संपूर्ण भारतातील कापूस शेतकऱ्यांना भरीव मार्गदर्शन प्रदान करण्यात वचनबद्ध आहे.