एकात्मिक कापूस, सोयाबीन, तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची !

जळगाव टुडे । कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देण्यासाठी राज्य शासन सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षांसाठी विशेष कृती योजना राबवित आहे. शेतकऱ्यांना सदरच्या योजनेतून मिळणाऱ्या निविष्ठांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे ( mahadbt.maharashtra.gov.in) अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. (Agriculture News )

सन २०२४-२५ मध्ये विशेष कृती योजनेंतर्गत चालू खरीप हंगामात नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस या निविष्ठा वाटप केल्या जाणार आहेत. त्यासाठी 30 जूनपर्यंत अर्ज करावेत. मेटाल्डीहाइड सोयाबीनसाठी 23 जून, २०२४ पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे कृषी विभागाने म्हटले आहे.

निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बियाणे, औषधे व खते या टाईल्स अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. जास्तीत-जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button