अबब…पुणे बाजार समितीत गव्हाच्या ‘या’ वाणाला 5200 रूपये प्रति क्विंटलचा भाव
Agriculture Market : राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नवीन हंगामातील गव्हाची आवक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान, गव्हाच्या शरबती वाणाला राज्यात सर्वाधिक भाव मिळताना दिसत आहे. शुक्रवारी (ता.29) देखील पुण्यात शरबती गव्हाला किमान 4400, कमाल 5200 आणि सरासरी 4800 रूपये प्रति क्विंटलप्रमाणे भाव मिळाला.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची एकूण सुमारे 2,516 क्विंटल आवक झाली होती. पैकी पुणे येथे शरबती गव्हाची 432 क्विंटल आवक होऊन त्यास 4400 ते 5200 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला होता. सोलापुरातही शरबती गव्हाची 1186 क्विंटल आवक झाली होती, त्यास 2505 ते 4000 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
जळगावमध्ये 147 गव्हाच्या वाणाची 33 क्विंटल आवक झाली, त्यास 2625 ते 2675 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. अकोल्यात लोकल गव्हाची 115 क्विंटल आवक झाली, त्यास 2600 ते 3600 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. छत्रपती संभाजीनगरात बन्सी गव्हाची 140 क्विंटल आवक झाली, त्यास 2586 ते 3000 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. नागपुरमध्ये लोकल गव्हाची 113 क्विंटल आवक झाली, त्यास 2011 ते 2400 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. नाशिकमध्ये लोकल गव्हाची 115 क्विंटल आवक होऊन 2300 ते 2701 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला.