Accident News : नेपाळमध्ये यात्रेकरूंची बस नदीत कोसळली; १४ ठार, बहुतांश भाविक जळगावचे…!

जाणून घ्या बसमधील प्रवाशांची नावे

Accident News : महाराष्ट्रातील प्रवाशांना देवदर्शनासाठी घेऊन जाणारी उत्तर प्रदेशची एक बस नेपाळमध्ये नदीत कोसळल्याने १४ प्रवासांनी आपला जीव गमावला आहे. या अपघातात एकून ३१ जण जखमी झाले असून, त्यापैकी पाच जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सर्व जखमींना उपाचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बहुतांश भाविक जळगावचे असून, जळगाव येथील जिल्हाधिकारी महाराजगंज येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. बसमधील सर्व प्रवाशांची नावे देखील समोर आली आहेत.

Accident News : Pilgrim bus falls into river in Nepal; 14 killed, most of the devotees are from Jalgaon…!

प्राप्त माहितीनुसार, तनहुन जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता सदरचा अपघात झाला. बस पोखराहून काठमांडूला जात होती. यावेळी ती चालकाच्या नियंत्रणाबाहेर जाऊन खोल नदीत पडली. या अपघातातील बहुतांश भाविक हे जळगावचे असून, जळगावचे जिल्हाधिकारी यूपीतील महाराजगंजच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तरप्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत. महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, स्वत: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

बस मालक विष्णू केसरवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या तीन बस गोरखपूरहून नेपाळला गेल्या होत्या. त्यात महाराष्ट्रातील बरेच लोक होते. आम्ही सगळ्यांना अलाहाबादहून आणले होते. येथून चित्रकूटला गेले. नंतर अयोध्येला आले. अयोध्येहून गोरखपूरमार्गे सुनौली आणि लुंबिनीला गेले. तेथून पोखराला गेले. तिन्ही बस पोखराहून काठमांडूला जात होत्या. मात्र, मुगलिंगजवळ बसला अपघात झाला. आता बसच्या चालकाचे दोन्ही मोबाईल नंबर बंद आहेत. त्यामुळे अपघातात बसचा चालक सुद्धा दगावल्याची शक्यता आहे.

बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नावे

WhatsApp Group

जितेंद्र पाटील (मुख्य संपादक)

गेल्या 24 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत. सकाळ-ॲग्रोवनमध्ये खान्देशातील बातमीदारीचा मोठा अनुभव. लोकसत्ता तसेच लोकमत, दिव्य मराठी वृत्तपत्रातही विपुल लिखाण केले आहे. प्रिंट मीडियासह यूट्युब, फेसबुक आणि आता वेब पोर्टलवर सर्व सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील. शेतीविषयी लिखाणात हातखंडा राहिला आहे. सन 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने सन्मानित.

Related Articles

Back to top button