Accident News : बैलाने घात केला; भरधाव रिक्षाला धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू…!

Accident News : माहूर-सारखणी रोडवरील लिंबायत फाट्याजवळ झालेल्या भीषण रिक्षा अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने जात असलेल्या रिक्षासमोर अचानक बैल आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्यामुळे रिक्षा रस्त्यावर पलटी होऊन सदर अपघात झाला. या अपघातात रिक्षात बसलेले छत्रपती गवळी (वय २६, रा. नखेगाव) यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच रेखा जाधव (वय ३३, रा. लखमापूर) यांना देखील डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तात्काळ पुसद येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

Accident News : Bull attacked; Two people died on the spot after hitting a speeding rickshaw…!

माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथील प्रवासी ॲपेरिक्षा (एमएच २६ टी ५३९०) घरी जात असताना लिंबायत फाट्याजवळ भीषण अपघात झाला. पेट्रोल पंपासमोर अचानक रिक्षासमोर बैल आल्याने त्याला धडक बसली. या धडकेत चालकाचे नियंत्रण सुटले आणि रिक्षा पलटी झाली. या अपघातात शैलेश राठोड (वय १८, रा. लखमापूर) आणि माधव गवळी (वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला.

माहूर तालुक्यातील लिंबायत फाट्याजवळ झालेल्या दुर्दैवी रिक्षा अपघातामुळे रस्त्यावरील मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, रिक्षासमोर अचानक बैल आल्याने हा अपघात घडला. राष्ट्रीय महामार्गालगत फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत, मात्र प्रशासनाकडून या समस्येवर उपाययोजना करण्यात आलेली नाही. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अपघातामुळे दोन कुटुंबांचे आधारस्तंभ गमावले गेले. आता तरी प्रशासनाला जाग येऊन मोकाट जनावरांच्या प्रश्नावर ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button