देवीच्या दर्शानासाठी जाणाऱ्या भाविकांचा अपघात; पाच जण जागीच ठार, 15 जखमी

जळगाव टुडे । देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना आज शुक्रवारी (ता.14) सकाळी घडली. या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले असून, इतर 15 भाविक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ग्वाल्हेरच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरची खळबळजनक घटना मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात घडली आहे. ( Accident News )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील मृत व जखमी हे ट्रॅक्टरवर बसून रतनगढ मातेच्या देवस्थानावर ज्वारी अर्पण करण्यासाठी जात होते. मात्र, देवस्थानावर पोहोचण्याच्या आधीच त्यांच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. सुमारे 200 भाविक अनेक ट्रॅक्टरवर बसून देवीच्या दर्शनासाठी आणि ज्वारी अर्पण करण्यासाठी जात होते. त्यापैकी एका ट्रॅक्टरला रस्त्याने येणाऱ्या ट्रकने धडक दिली आणि चालकाचे नियंत्रण सुटले. सुमारे 30 भाविक बसलेले ट्रॅक्टर थेट पुलाखाली जाऊन पडल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 15 भाविक गंभीर जखमी झाले. त्यात एक महिला व दोन मुलींचा समावेश आहे. सर्व मृत आणि जखमी हे दिसवार गावचे रहिवाशी आहेत.

अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांनी लगेच घटनास्थळी भेट दिली आणि जखमींना ग्वाल्हेरच्या रूग्णालयात दाखल केले. घडलेला अपघात एवढा भीषण होता, की तो पाहिल्यानंतर अनेकांचा थरकाप उडाला. पाचही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नंतर दवाखान्यात रवाना करण्यात आले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button