भरधाव पिकअप व्हॅनचे ब्रेक फेल झाल्याने 18 जण ठार; मृतांमध्ये 16 महिलांचा समावेश
जळगाव टुडे । भरधाव वेगात असलेली पिकअप व्हॅन ब्रेक फेल झाल्याने रस्त्यालगतच्या 20 फूट खोल खड्ड्यात जाऊन पडल्याने 18 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये 16 महिलांचा समावेश आहे. सदरचा भीषण अपघात हा सोमवारी (ता.20) दुपारी छत्तीसगडमधील कुकडूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बहपनी गावाजवळ घडला आहे. अपघातावेळी पिकअपमध्ये एकूण सुमारे 25 ते 30 आदिवासी मजूर प्रवास करत होते. अपघात इतका भीषण होता की 13 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Accident News)
अपघातात आठपेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी 4 जणांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. मृत्युमुखी व जखमी हे सर्व आदिवासी समाजातील आहेत. तेंदूपत्ता तोडून वाहनातील सर्व लोक पिकअपमधून सेमहरा गावाकडे निघाले होते, असे सांगण्यात येत आहे. मिलाबाई बंजारी (48), टिकूबाई गुलाबसिंग (40), सिरदरी सिलाब गोंड (45), जानियाबाई जानौ गोंड (35), मुंग्याबाई बजरू मारावी (60), झांगलो बाई धनीराम (62), सियाबाई तिरीट गोंड (50), किरण शिवनाथ (15), पाटोरीनबाई दयाराम गोंड (35), धनैयाबाई सिरदरी गोंड (48), शांतीबाई शिवनाथ (35), प्यारीबाई फूलचंद (40), सोनमबाई फूलचंद (१६), विस्मतबाई (४५), लीलाबाई मानसिंग (35), परसादियाबाई रामचंद्र (30), भारती मानसिंग (१३), सुंतीबाई मदनसिंग (45), अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.