जळगाव- वसई बसला चांदवडच्या राहुड घाटात ट्रकची जोरदार धडक, चार प्रवाशी जागीच ठार

मृतांची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत

Jalgaon Today : जळगावहून वसईकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसला नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या घाटात आज मंगळवारी (ता.30) सकाळी दहाच्या सुमारास ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसची एक बाजू कापली गेली असून, चार प्रवाशी जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव-चांदवड दरम्यान सकाळी साधारण पावणे दहाच्या सुमारास सदरचा अपघात झाला. (Accident News)

बस आणि ट्रकच्या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरची एसटी बस जळगाव येथून नाशिकमार्गे वसईच्या दिशेने जात होती. ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 45 प्रवासी होते. बसच्या पुढील बाजूला डावीकडे ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे आतील प्रवाशांना सावरण्यासाठी वेळ देखील मिळाला नाही. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानंतर अनेकजण बाहेर फेकले गेले तसेच बसच्या खिडक्यांवर जाऊन आदळले. अपघात इतका भीषण आहे की, एसटीची एक बाजू पूर्णपणे कापली गेली आहे. त्यामुळे खिडक्यांच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं मदत कार्य सुरू केले. अपघातामुळे महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. मृतांची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button