‘आपले सरकार’ तक्रार निवारण प्रणाली सुरु, 24 दिवसाच्या आत तक्रारीचे होणार निवारण
Aaple sarkar : नागरिक आणि प्रशासन यांच्यातील ऑनलाईन संवाद वाढविण्यासह राज्यातील नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने तक्रार दखल करता यावी तसेच प्रशासनाला ऑनलाईन पध्दतीने प्राप्त तक्रारींचे 21 दिवसांच्या आत निवारण करता यावे, यासाठी आपले सरकार ही तक्रार निवारण प्रणाली शासनाने कार्यान्वीत केली आहे.
सदर तक्रार निवारण प्रणाली www.aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक 201608241430339207 असा आहे. तरी नागरिकांनी त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आपले सरकार या ऑनलाईन प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी केले आहे.