मोठी बातमी…जळगावच्या जिल्हा कारागृहात धारदार शस्त्राने कैद्याचा झाला खून !

जळगाव टुडे । शहरातील जिल्हा कारागृहात आज बुधवारी (ता.१०) सकाळी दोन कैद्यांमध्ये झालेल्या वादाच्या घटनेतून एका कैद्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. मोहसीन असगर खान (३४) या कैद्याचा त्यामुळे मृत्यू झाला असून, या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू झाली आहे. ( Crime News )

Crime News
भुसावळचे माजी नगरसेवक आणि रिपाइंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबूराव खरात यांच्यासह अन्य काही जणांवर एका टोळीने गोळीबार केला होता. त्यात रवींद्र खरात यांच्यासह एकूण पाच जणांचे बळी गेल्याचे उघडकीस आले होते. पूर्व वैमनस्यातून झालेल्या त्या हत्याकांडातील आरोपींना पोलिसांनी अटक करून जळगाव कारागृहात ठेवले आहे. त्यातील एक आरोपी मोहसीन असगर खान आणि दुसरा आरोपी यांच्यात मंगळवारी दुपारी भांडण झाले होते. रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास दुसर्‍या आरोपीने मोहसीन खान याच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. मोहसीनला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र, त्याचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.

दरम्यान, धारदार शस्त्राने एका कैद्याचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर कारागृह प्रशासनाच्या कारभारावर आता बोट ठेवले जात आहे. कारण, एवढा कडक बंदोबस्त असताना कारागृहाच्या आत धारधार शस्त्र गेलेच कसे, असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे. घडलेल्या खुनाच्या प्रकाराला जबाबदार धरून कोणावर कारवाई होते, त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button